Accident : पाटस चौकीतील डॅशिंग हवालदार संदीप कदमांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता, तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपींची चौकशी होणार?


Accident बारामती : यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीत हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या एकाला शुक्रवारी (ता. २२) व्यायामासाठी संध्याकाळी जात असताना तीन चाकी टेम्पोने धडक दिली. (Accident)

संदीप जगन्नाथ कदम असे त्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दोन दिवसापूर्वी शुक्रवारी (ता. २२) बारामती शहरात हॉटेल अभिषेक शेजारी ते सर्व्हिस रोडने चालत असताना पाठीमागून त्यांना तीन चाकी टेम्पो ने जोरदार धडक दिली. ही धडक दिल्यानंतर हा टेम्पो तिथे थांबला नाही.

संदीप कदम यामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने बारामतीतील खाजगी रूग्णालयात दाखल केले, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची समजते.

त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते. इंदापूर तालुक्यातील कुरवली, लासुर्णे येथील रहिवासी असलेले संदीप कदम हे डॅशिंग हवालदार म्हणून ओळखले जातात.

मागील तीन वर्षापासून संदीप कदम हे पाटस पोलीस चौकीत कार्यरत आहेत. गुन्हेगारांना थेट अंगावर घेणारा पोलीस कर्मचारी म्हणून संदीप कदम यांची ओळख आहे.

तसेच हा केवळ अपघात नसून संभाजी कदम यांनी अत्यंत कौशल्याने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यातील काही आरोपी सध्या तुरुंगाबाहेर आले असल्याने त्यांच्याकडून त्यांचा अपघात घडवून आणला की काय? अशी चर्चा आता सुरू आहे.

दरम्यान बारामती पोलिसांनी टेम्पो चालकाचा छडा लावला असून त्यास ताब्यात घेतले आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांचा इतरही बाजूने तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!