दुर्घटना टळली! भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड ; काय घडलं?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातात निधन झाल्याने विमान वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता भाजपा नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये असलेला तांत्रिक बिघाड पायलटच्या वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला भाजपा नेत्या पंकजा मुंडे या लातूर दौऱ्यावर जाणार होत्या.मात्र टेक ऑफ पूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर मुंडेनी आपला प्रवास आणि संभाच्या वेळा पुढे ढकल्या असल्याची माहिती समोर आली आहे.


मंत्री पंकजा मुंडे या हेलिकॉप्टर मधील बिघाडामुळे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूर येथील सभांना हजेरी लावणार आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी त्या आज लातूर सह सोलापूरला जाणार आहेत.एकीकडे राज्यात नुकत्याच झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र सह देशात खळबळ उडाली आहे.
या विमानं अपघातानंतर आता विमानाच्या सुरक्षेवर प्रश्न आणि संशय उपस्थित केला जात आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
