अभिषेक बच्चन येणार राजकारणात?, ‘या’ ठिकाणी उतरणार निवडणुकीच्या मैदानात…


मुंबई : आजकाल मराठी असो, हिंदी असो वा साऊथ.. अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसात काही मराठी कलाकारांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक बॉलीवुड सुपरस्टार राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसुन तो आहे अभिषेक बच्चन. मेगास्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याबद्दल सध्या बातम्या चर्चेत आहेत म्हणजे, अभिषेक आता आई- बाबांप्रमाणे राजकारणात आपले नशीब आजमावणार आहे.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन हा लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करू शकतो. विशेष म्हणजे २०२४ ची निवडणूकही अभिषेक बच्चन हा लढणार असल्याची माहिती आहे.

अभिषेक बच्चन हा अखिलेश यादव याची समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. २०२४ ची निवडणूक अभिषेक बच्चन हा प्रयागराजमधून लढणार असल्याचे सांगितले जातंय.

राजकारणात एन्ट्रीबद्दल अभिषेकचं मत काय?

अभिषेक बच्चनने २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राजकारण प्रवेशाबद्दल विचारण्यात आले होते. वडिलांप्रमाणे निवडणूक लढवता येईल का, असे विचारले असता अभिषेक म्हणाला होता की, पडद्यावर राजकारण्याची भूमिका नक्कीच साकारू शकतो पण खऱ्या आयुष्यात राजकारणात कधीच प्रवेश करणार नाही.

अभिषेकचा राजकारण प्रवेश निव्वळ अफवा

वेबसाइट ‘ई-टाइम्स’नुसार, अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करत नाहीये. हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे खरे नाही. या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!