Abdul Sattar VS Hemant Patil : मोठी बातमी! मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अश्लिल शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल, उडाली खळबळ..

Abdul Sattar VS Hemant Patil सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. आता एकाच पक्षातील मंत्री आणि खासदार यांच्यात शिवीगाळ आणि खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे.
शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. Abdul Sattar VS Hemant Patil
या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चक्क शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरुन सामान्यांसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.