Abdul Sattar : कुत्र्यासारखे मारा, त्यांचं कंबरडं मोडा, इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे, गौतमीच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांचे आदेश..

Abdul Sattar : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्तानं गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी झालेल्या गोंधळावेळी अब्दुल सत्तार स्वत: स्टेजवर होते त्यांनी तिथूनच माईक हातात घेत पोलिसांना लाठीचार्जचे आदेश दिले. यावेळी त्यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलत पोलिसांना देखील अरे तुरे करत लाठीचार्जचे आदेश दिले
अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला. धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असेही सत्तार म्हणाले.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी बुधवारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होती.
यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना स्टेजवरून थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला. Abdul Sattar
धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना ‘कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे’ अशी भाषा सत्तार यांनी माइकवरून वापरली. तसंच गांxx हड्डी तुटली पाहिजे असी भाषाही त्यांनी वापरली.
सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या. सत्तार यांनी आदेश देताच बंदोबस्तसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी थेट समोर बसलेल्या लोकांवर लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांकडून लाठीमार होताच एकच धावपळ उडाली.
दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ट्वीट करत म्हटले आहे की, “महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा… मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात.
महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का?…सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम?, असे वडेट्टीवार म्हणाले.