खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण, पोलिसांनी सूत्र फिरवली आणि…


अमरावती : वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण यांची पत्नी आणि मुलासह तिघांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

यामुळे अनेकांची मोठी चाकधूक वाढली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून या तिघांची सुटका केली आहे. यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही घटना घडली, त्यावेळी खासदार सत्यनारायण हे विशाखापट्टणममध्ये नव्हते.

असे असताना मात्र, खासदाराचे जवळचे सहकारी व्यंकटेश्वर राव त्यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचेही त्या टोळीने अपहरण केले होते. अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली.

मोबाईल लोकेशनच्या आधारे या अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात आला. त्याआधारे काही तासांतच अपहरण झालेल्या खासदाराच्या पत्नीसह तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!