चिंचवड पोटनिवडणुकीत ‘आप’ मैदानात,आता निवडणुकीत रंगत येणार…!
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीला बिनविरोध होईल अशी वाटणारी ही निवडणूक आताच किमान तिरंगी तरी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता आम आदमी पार्टी निवडून लढवणार आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत इतर कुठल्या राजकीय पक्षाशी ती करणार नाही. स्वबळावर ही निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. यामुळे आता रंगत वाढली आहे.
उमेदवारी दोन दिवसात जाहीर करू असे आप चे प्रदेश उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांसह अनेक नेत्यांना बोलवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही त्यासाठी विनंती करणार आहे, असे ते म्हणाले. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील तयारी सुरू केली आहे.