Aadhaar Card : आधार कार्ड म्हणजे वयाचा पुरावा नाही, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय…
Aadhaar Card : सुप्रीम कोर्टाने आधार कार्डबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध मानलं जाणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
रस्ते अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे वय ठरवण्याबात एक याचिका पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, या याचिकेवर बोलतना सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. वयाचा पुरावा म्हणून कोणते कागदपत्र पाहिले जाईल याबाबतही माहिती दिली आहे.
बाल न्याय अधिनयम २०१५ च्या कलम ९४अन्वये शाळा सोडल्याचा दाखला हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जावा असंही त्यांनी हा निर्णय देताना म्हटलं आहे. आता प्रश्न असा आहे ज्यांचाकडे शाळा सोडल्याचा दाखला नाही त्यांचं काय?
दरम्यान, २० डिसेंबर २०१८ मध्ये आधार कार्ड हे ओखळपत्र म्हणून वापरले जाऊ शकतं असं स्वत: UIDAI ने आपल्या परिपत्रकात म्हटलं होतं. मात्र जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. Aadhaar Card
एका व्यक्तीनं नुकसान भरपाई घेण्यासाठी मृत व्यक्तीचे वय जास्त दाखवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला होता. १९.३५ लाख रुपयांची नुकसान भरपाई हवी होती. मात्र त्याने चुकीचे वय दाखवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला.
दरम्यान, जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला आणि संबंधित व्यक्तीचे नुकसान भरपाई कमी करण्यात आली. शिवाय आधार कार्ड हा वयाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही असंही निर्णय कोर्टानं दिला आहे.