सिंहगड रोडवर धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या, पुण्यात गुन्हेगारी वाढली..


पुणे : किरकटवाडी सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्या जवळील गोसावी वस्ती समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह कालव्याजवळील झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राहुल चंद्रकांत आटोळे ( वय ३६ रा. गोसावी वस्ती नांदेड ता. हवेली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आज सोमवार (ता.१२) सकाळी सिंहगड रस्त्यावरील सिल्वर बर्च हॉस्पिटल च्या समोर कालव्यालगत असलेल्या झुडपामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.

पुण्यात नेमकं चाललंय काय? आता पत्रकारावर झाला गोळीबार, १५ दिवसांपूर्वीही झाला होता हल्ला..

याबाबत हवेली पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे , पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस हवालदार अशोक तारू, पोलीस नाईक संतोष भापकर, राजेंद्र मुंडे, प्रवीण ताकवणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राज्यात अखेर पावसाला सुरुवात, ‘या’ भागात आज पडणार मुसळधार पाऊस, यलो अलर्टही जारी…

हत्या झालेल्या राहुल आटोळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आहेत. राहुलचा पेरू विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. त्याची हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!