मुंबईत रस्त्यांवर धावत्या रिक्षेत तरुणीवर बलात्कार; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक..

मुंबई : चालत्या ऑटोमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकत्याच एका २४ वर्षीय रिक्षा चालकाला अटक असून त्याची रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
इंद्रजीत सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीने गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये चालत्या रिक्षात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. एवढंच नाही तर त्याने बलात्कारानंतर तरुणीला लाथांनी मारहाणही केली होती. कोणालाही न सांगण्याची धमकी देऊन आरोपी युपीला फरार झाला होता. अखेर त्याला पोलिसांनी बेड्या घातल्या.
दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. बेलापूर येथील मावशीला भेटून ही तरुणी मुंबई गोरेगावला परतत होती. यावेळी रिक्षा चालकाने हे धक्कादायक कृत्य केले होते.
पोटातून रक्तस्त्राव झाल्यानंतर महिलेने तक्रार केली होती. आरे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरु केला होता. आता पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले.
आयपीसीच्या कलम ३७६ आणि ५०६ गुन्हा आरोपीवर लावण्यात आला असून त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत.