मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर…


मुंबई : पश्चिम रेल्वेवरील ग्रॅण्ट रोड स्थानकात धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत तरुणीने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रेल्वे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

तसेच अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला.

याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तांत्रिक आणि इतर पद्धतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!