पुण्यातील तरुणीला इन्टाग्रामवर मैत्री महागात ; तरुणांन कोल्हापूरात भेटायला बोलवलं अन् चार दिवस…

पुणे: सोशल मीडियाच्या वापरातून तरुण-तरुणींचे प्रेम संबंध जुळण्याचा ट्रेड आजकाल पाहायला मिळत आहे. आता पुण्यातील 19 वर्षीय तरुणीची इंस्टाग्रामवर कोल्हापूरच्या तरुणाशी मैत्री झाली.या मित्राच्या आमिषाला बळी पडून 4 दिवसांपूर्वी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाली होती. काही सुजाण तरुणांना ती बाकड्यावर रडत बसली होती. त्यावेळी भयानक वास्तव समोर आलं.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील 19 वर्षीय तरुणीची कोल्हापुरातल्या 22 वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली.संबंधित तरुणाने तिला कसबा बावडा परिसरात भेटायला बोलावले होते, मात्र प्रत्यक्षात तो तिथे आलाच नाही. त्या तरुणीकडे ना स्वतःचा मोबाईल होता, ना प्रवासासाठी पैसे..तो मित्र तिला तीन दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरवत राहिला आणि अखेर मंगळवारी त्याने दिलेला पत्ताही खोटा निघाला. आपली फसवणूक झाल्याचे त्या तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर एका ठिकाणी बाकावरच ती रडत बसली.
दरम्यान ती 19 वर्षांची युवती रडत बसलेली बाब टिपू मुजावर यांच्या लक्षात येताच त्यांनी ओंकार पाटील यांना माहिती दिली. तरुणांनी तिची विचारपूस केली. सुरुवातीला ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, मात्र तरुणांनी विश्वास दिल्यानंतर तिने सर्व घटना सांगितली.दोघांनी मिळून पोलिसात धाव घेतली अन् तरुणीची माहिती दिली. पोलिसांनी देखील तातडीने तरुणीच्या दिशेने धाव घेतली अन् नेमकं काय झालं? याची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.

त्या युवतीने दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या आईशी संपर्क साधला असता पुण्यातील बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच दिली होती. त्यानंतर आपली मुलगी कोल्हापुरात सुरक्षित असल्याचे ऐकताच आईला रडू कोसळलं. त्यांनी स्थानिक तरुणांना आपली मुलगी ताब्यात घेईपर्यंत सुरक्षित ठेवण्याची कळकळीची विनंती केली. पोलिसांकडून त्या तरुणाचा शोध सुरू आहे.

