सोरतापवाडीत डंपरने चिरडल्याने तरुण जागीच ठार; मुरुम वाहतुक करणाऱ्या डंपरने घेतला तरुणाचा जीव; चालकाला अटक…

उरुळीकांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाट्याजवळ मुरुम वाहतुक करणाऱ्या हायवा डंपरने दुचाकीस्वार तरुणाला डाव्या बाजूला अंदाज न आल्याने झालेल्या अपघात तरुणाचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवार (दि.३) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात हायवा डंपरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

विक्रम दयानंद सूर्यवंशी( वय १९ वर्षे, रा. बोरीभडक,ता.दौंड, जि.पुणे) असे मृत झालेल्या तरुणांचे नाव आहे. तर याप्रकरणी सुनिल जगन्नाथ शिंदे (रा.सोरतापवाडी, ता.हवेली )असे गुन्हा दाखल झालेल्या हायवा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णा दयानंद सुर्यवंशी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरडे येथून मुरुम भरून घेऊन हायवा डंपर सोरतापवाडीफाट्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना डंपर क्र. MH12 AQ 5797 ने डाव्याबाजूने बोरी भडक येथे घरी जेवणासाठी ऍक्टीव्हा MH42 BZ 8356 ने निघालेल्या विक्रम सुर्यवंशी याला गाडीचा अंदाज न आल्याने जोरदार धडक देऊन तो गाडीखाली जाऊन चिरडला गेला.

या अपघातात विक्रमच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. हा अपघात अंदाज न आल्याने घडल्याने डंपर चालकाला निष्काजीपणास कारणीभूत ठरून चालक सुनिल शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.