कुंजीरवाडी येथील यात्रेत तरुणावर कोयत्याने हल्ला; दोघांना अटक


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पिरसाहेबांच्या उरुस यात्रेत जुन्या वादाच्या रागातून भर चौकात कोयता काढून चार जणांनी एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील जखमी गौरव सुदर्शन खलसे (वय २४, या. माळवाडी, कुंजीरवाडी, ता. हवेली) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांवरून गुन्हा दाखल होताच प्रविण राजाभाऊ घोडके (वय २१, रा. मगरवस्ती, म्हातोबाची आंळदी, ता. हवेली जि. पुणे) व ऋषीकेश नाना लोंढे (रा. १२ फाटा चौकी, जयगणेश पार्क कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे इतर दोन साथीदार फरार झाले आहेत.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की,गौरव खलसे हा त्याचा मित्र आदेश बरडे याच्यासोबत यात्रेत गेला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघे घरी परतत असताना बाजार मैदान परिसरात काही तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून प्रविण घोडके याने कमरेला लपवलेला लोखंडी कोयता बाहेर काढून पाठीमागील बोथट बाजूने उजव्या हातावर आणि पाठीवर वार केले. यामध्ये गौरव जखमी झाला. त्याच वेळी ऋषीकेश नाना लोंढे व इतर दोन साथीदारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ आणि दमदाटी केली. यांमुळे यात्रेतील वातावरण तणावपूर्ण झाले.

गौरव आणि त्याचा मित्र दोघांच्या तावडीतून सुटून घरी पळाले. नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी प्रविण घोडके आणि ऋषीकेश लोंढे यांना ताब्यात घेतले, तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेसारख्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात उघडपणे कोयता घेऊन फिरत तरुणावर हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!