सोशल मीडियावरून तरुणाने पाडली प्रेमाची भुरळ ; शाळेला दांडी मारायला सांगून तरुणीला हॉटेलवर नेलं अन्….

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून तरुण व तरुणीमध्ये प्रेम संबंध सुरू होण्याचे प्रकार अनेक वेळा घडताना दिसत आहेत. अशातच आता नागपुरात एका तरुणाने तेरा वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर ओळख करून प्रेम संबंध निर्माण केले.संतापजनक म्हणजे या तरुणाने मुलीला शाळेला दांडी मारायला लावून हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव करण केशी असे आहे, तर पीडितेचे नाव मानसी (बदलेलं नाव) असे आहे. करण आणि मानसीची सोशल मीडियावर ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.करण आणि मानसीला तिच्या शाळेजवळ यायचा आणि तिला शाळेत जाऊ नको सांगून तिला हॉटेलवर न्यायचा. हॉटेलवर नेवून तिच्यावर बलात्कार करायचा.
दरम्यान एके दिवशी आरोपीने मुलीला गाडीवर बसवून फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे नेऊन मुलीने विरोध केल्यावरही तिच्यावर अत्याचार केला. या सर्व घटनेदरम्यान तरुणी वारंवार शाळेत गैरहजर असायची.शाळेत मुलगी वारंवार गैरहजर असल्याबाबत शाळेतून पालकांना शिक्षकांनी संपर्क केला. त्यानंतर पालकांनी मुलीला याबाबत विचारल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला.

दरम्यान पालकांनी या प्रकरणात तातडीने पाऊल उचलत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. पालकांच्या तक्रारीवरून तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.