पुण्यातील तरुणाला डेटिंग ॲपवरची ओळख महागात पडली ; पहिल्याच भेटीत शरीर संबंध अन…..

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात गे डेटिंगअँप वर होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.अशातच आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पुण्यातील एका तरुणाला डेटिंग ॲपवरून झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका युवकाची गे डेटिंग ॲपवरून दुसऱ्या तरुणाशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर पहिल्यांदा भेट झाली त्यावेळी कारमध्ये त्यांने शरीरसंबंध ठेवत त्याची मोठी फसवणूक केली. त्यानंतर या युवकाला मारहाण करत ब्लॅकमेल करण्यात आले. आरोपीने पीडित तरुणाकडून 10 हजार रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.नांदेडसिटी परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.
या प्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IPC 2023 च्या कलम 309(3), 115(2), 351(3), 131(2)(5) अंतर्गत गु.र.नं. 138/2025 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी रॉबीन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे (वय 27) याला अटक केली आहे. तो नांदेडफाटा, सिंहगड रोड येथे राहतो. त्याला 17 जुलै 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच, ओंकार मंडलिक नावाचा दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लोकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.