पुण्यातील कोंढव्यातील तरुणानं चक्क स्कूटर पेटवली ; काय आहे प्रकरण?


पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या तरुणाने खराब झालेली इलेक्ट्रिक स्कूटर चक्क पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.
स्कूटर वारंवार तक्रारी करूनही दुरुस्त न झाल्यामुळे संबंधित तरुणाने थेट सर्व्हिस सेंटरमध्ये स्कूटर पेटवून दिली. ही घटना सोमजी चौकातील साई सर्व्हिस सेंटरमध्ये घडली आहे.याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरायु चंद्रकांत घोणे यांनी त्यांच्या वडिलांसाठी ई-स्कूटर घेतली होती. मात्र काही दिवसांतच ती बंद पडली आणि वारंवार फॉलोअप करूनही कंपनीकडून कोणतीच ठोस मदत मिळाली नाही. काही दिवसानंतर समजलं की,स्कूटरची मोटार खराब झाली असून ती मोफत बदलली जाईल. मात्र ती कधी मिळेल, हे न सांगता वेळ मारून नेण्यात आला. यावरून कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला.त्यानंतर मोटारसायकलमधून पेट्रोलची बाटली घेऊन आले आणि आपल्या स्कूटरवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. या घटनेत स्कूटर पूर्णतः जळून खाक झाली.

याप्रकरणी साई सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापक जालिंदर विठ्ठल नेवसे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात घोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!