वर्षभरापूर्वी थाटामाटात लग्न, अनैतिक संबंधामुळे मोडला हसता खेळता संसार; विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल


पुणे: छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक छळ, मानसिक त्रास आणि पतीच्या अनैतिक संबंधामुळे त्रस्त झालेल्या एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, काजल अमोल लघाणे असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे.काजल हिचा विवाह 25 मार्च 2025 रोजी अमोल लघाणे याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. अमोल हा वारकरी संप्रदायातील असून कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारा ‘मृदंगाचार्य’ म्हणून ओळखला जातो. संसाराला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमोलचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे काजलच्या निदर्शनास आले होते. तिने या गोष्टीला विरोध केला असता, अमोलने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

अमोलच्या बाह्य अनैतिक संबंधांचा सुगावा काजलला लागल्यानंतर त्याने वारंवार तिला शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले होते. या छळाबाबत काजलने आपल्या माहेरच्या लोकांनाही कल्पना दिली होती. मात्र, पतीच्या वागण्यात बदल झाला नाही, उलट छळ वाढतच गेला. अखेर या जाचाला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवलं.

काजलच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी रांजणगाव शेणपुंजी येथे धाव घेतली. आपल्या मुलीच्या मृत्यूला तिचा पती अमोल लघाणे हाच जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत असे क्रूर वर्तन केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!