भरधाव डंपरने महिलेला चिरडले; उरुळीकांचन तळवाडी चौकात महिलेचा जागीच मृत्यू…


उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात रस्ता ओलांडणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेला टँकरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आज सोमवारी (दि. १६) सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

प्रमिला अशोक गोळे (वय- ५०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला ही उरुळी कांचनचे माजी पोलीस पाटील अशोक गोळे यांच्या पत्नी असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला गोळे या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकातून रस्ता ओलांडुन शिंदवणे रस्त्याकडे जायचे होते. मात्र वाहतूक मोठी असल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या राहिल्या होत्या.

यावेळी सोलापूर उरुळी कांचन गावातून एक डंपर हा महामार्गावरून यवत च्या बाजूने निघाला होता. कंटेनर वळण घेत असताना रस्त्याच्या बाजुळक उभ्या राहिलेल्या प्रमिला गोळे यांना डंपरने जोरदार धडक दिली. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

दरम्यान, या अपघातात त्यांना जोरदार जखमा झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. सदरचा डंपर हा कोरेगाव मूळ येथील बोधे काकडे वस्ती येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!