डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, डोक्यावरून चाक गेलं अन् क्षणात सगळं संपलं, अपघात स्थळावरून चालक पळाला…


पुणे : कुठेना कुठे रोजच अपघात होतच आहे. तसेच पुण्यातील कापूरहोळ-मांढरदेवी या रस्त्यावर पसरवलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून पडली. या वेळी दुचाकीवरुन खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून भरधाव वेगात असलेल्या डंपरचे चाक गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना घडताच डंपर चालक फरार झाला आहे.

लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५, रा. उंदेरी, ता. महाड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी (ता. १५) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कापूरहोळ-भोर रस्त्यावर नेकलेस पॉइंट उताराला ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश येलमकर आपल्या कुटुंबासह पुण्यातील खडकवासला येथे कामानिमित्त राहत आहे. मकरसंक्रांत दिनी मुळगाव असलेल्या उंदेरी या गावची पूजा असल्याने गावाकडे अविनाश यांची आई लताबाई यांना घेऊन जात असताना रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरली होती.

दुचाकी घसरल्यामुळे अविनाश व त्यांची आई दोघेही रस्त्यावर पडले होते. यावेळी समोरून येणाऱ्या डंपर चालकाने गाडीचा वेग कमी न केल्याने अविनाश यांच्या आईच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर अविनाश यांनी डोक्यात हेल्मेट घातल्याने ते वाचले आहे.

दरम्यान, किकवीचे पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण, तुळशीराम अहिरे, दिलीप अलगुडे घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात घेऊन गेले होते. मात्र लताबाई जागीच ठार झाल्या होत्या. याप्रकरणी पोलीस निरीक्षक डंपर चालकाचा शोध घेत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!