महिलेनं घरी बोलवलं अन् घडलं आक्रीत, डोंबिवलीत ज्वेलर्स मालकासोबत भयंकर प्रकार…


डोंबिवली : डोंबिवली शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. इथं एका महिलेनं एका सराफा व्यावसायिकाला घरी बोलवून नको तेच कृत्य केलं आहे. आरोपी महिलेनं दागिन्यांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने एका ज्वेलर्सला घरात बोलावून घेतलं होतं.

दरम्यान, यानंतर आरोपींनी ज्वेलर्सला ओलीस ठेवून त्याच्याकडील लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली आहे. ही थरारक घटना डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव येथील जय मल्हार इमारतीच्या पाचव्या मजल्यावर २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नारायणलाल रावलं असं पीडित ज्वेलर्सचं नाव असून डोंबिवली परिसरात त्यांचं ज्वेलर्स दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी वैशाली जाधव नावाच्या एका महिलेने रावल यांच्या दुकानात जाऊन दागिन्यांची ऑर्डर दिली होती.

रावल यांनी अ‍ॅडव्हान्स रक्कम मागितल्यावर या महिलेने त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि तिची मुले ॲडव्हान्स रक्कम देतील, असं सांगितलं. रावल हे दिलेल्या पत्त्यावर पोहोचले असता, त्या घरात दोन अनोळखी तरुण उपस्थित होते. त्यांनी आई थेरपीसाठी बाहेर गेल्याचे सांगून रावल यांना घरात घेतले.

रावल घरात येताच, त्या दोन पुरुषांनी घराचा दरवाजा बंद केला, बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवला आणि रावल यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर त्यांनी रावल यांना दोरीने घट्ट बांधून ओलीस ठेवले.

दरोडेखोरांनी रावल यांच्या जवळ असलेले ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लुटला आणि त्यानंतर ते तिघेही (दोन पुरुष आणि त्यांची साथीदार महिला) घटनास्थळावरून पसार झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!