विधवा महिलेवर सलग १२ तास अत्याचार, एक- दोन नाही तर ‘इतक्या’ जणांनी तोडले लचके, कुठे घडली घटना?


उत्तरप्रदेश : पतीचं निधन झालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती ज्या वीटभट्टीवर काम करत होती. त्याच वीटभट्टीच्या मालकाची तिच्यावर वाईट नजर होती. शेवटी त्याने डाव साधत त्याच्या मित्रांसह या महिलेवर अत्याचार केले.

त्या पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या नराधमांनी सलग 12 तासा या महिलेचे शोषण केले. तिथून सुटका करून घेतल्यानंतर महिलेने पोलिस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. ही घटना उत्तरप्रदेशातील पटहेरवा परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित महिला विजय कुशवाहा नावाच्या व्यक्तीच्या वीटभट्टीवर काम करत होती. काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे ती एकटी होती. या एकटे पणाचा गैरफायदा घेण्याचा प्लॅन कुशवाहा याने बनवला होता. त्यात त्याच्या दोन मित्रांचाही सहभाग होता.

9 फेब्रुवारी रोजी रात्री विजय कुशवाहा याने दोन साथीदारांसह कारमधून या महिलेचे अपहरण केले. त्यानंतर तिला पडरौना येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. तिथेच सलग 12 तास तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हे तिघे ही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार करत राहीले.

महिलेला हे अत्याचार सहन करण्या शिवाय पर्याय नव्हता. कशी तरी तिने त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. या प्रकरणी तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडितेची सुरुवातीला पोलिसांनी दखल घेतली नाही. आरोपीचे राजकीय लागेबांधे असल्याने पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. बलात्कार झालेला असतानाही पोलिसांनी केवळ छेडछाडीचा गुन्हा नोंदवला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!