शेतकऱ्यांना मोठा धक्का! नेपाळमधून एकूण १० टन टोमॅटो आयात…


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना NCCF केंद्र सरकारच्या वतीने टोमॅटोच्या आयातीसह देशांतर्गत खरेदी करत आहे आणि ग्राहकांना चढ्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी अनुदानित दराने त्यांची किरकोळ विक्री करत आहे.

नेपाळमधून आयात केलेले सुमारे ५ टन टोमॅटो गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये ५० रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने किरकोळ विक्री केले जातील. (NCCF) नेपाळमधून एकूण १० टन टोमॅटो आयात करण्याचा करार केला आहे. यामुळे दर कमी होणार आहेत.

दरम्यान, दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानमध्ये देशातील प्रमुख उत्पादक राज्यांमधून खरेदी केलेले टोमॅटो ५० रुपये प्रति किलो या अनुदानित दराने विकले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील दर कमी मिळणार आहे.

नेपाळमधून आयात श्रेणीबद्ध पद्धतीने केली जाईल कारण काही राज्यांच्या मंडईंमध्ये देशांतर्गत आवक सुरू झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार NCCF ने पुढाकार घेतला आहे. यामुळे हालचाली सुरू आहेत.

NCCF चे व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा म्हणाले, आम्ही नेपाळमधून १० टन टोमॅटो आयात करण्याचा करार केला आहे. यातील ३-४ टन काल उत्तर प्रदेशात वितरित करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!