धक्कादायक! बारामतीच्या जोडप्याचे कारमध्ये भयंकर कांड, पतीने पत्नी शैलाला गाडीतून ढकलून SUV खाली चिरडलं, नेमकं काय घडलं?


बारामती : येथील एक जोडपं त्यांच्या कारने गाणगापूर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी चाललं होतं. सकाळी त्यांची कार बल्लुरगा गावाजवळ पोहोचली. त्यावेळी पती-पत्नीमध्ये कुठल्या तरी कारणावरुन वादवादी झाला. यानंतर रागाच्या भरात अक्षयने पत्नी शैलाला गाडीतून धक्का देऊन बाहेर पाडलं. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

पत्नी शैला रस्त्याच्याकडेला जमिनीवर पडली होती. अक्षय तिचे केस पकडून तिला मारहाण करत होता. शैला मदतीसाठी आरडाओरडा करत होती. त्यावेळी तिथून जाणारे काही लोक त्यांच्या भांडणात पडले. शैलाला मारहाण करणाऱ्या अक्षयला रोखलं व त्याला गाडीत बसवलं. काही मिनिटांनी अक्षय गाडी एका शेताजवळ घेऊन गेला.

नंतर त्याने शैलाला धक्का देऊन गाडी बाहेर ढकलून दिले. त्याने त्याच्या SUV कारखाली शैलाला चिरडलं. यामुळे मोठी खळबळ उडाली. अक्षय आणि शैलाच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत. ते मूळचे महाराष्ट्राच्या बारामतीचे राहणारे आहेत. शैलाचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असावेत हा अक्षयच्या मनातील संशय या हत्येमागे असू शकतो.

कलबुर्गीचे पोलिस अधीक्षक अड्डुरु श्रीनिवासुलु यांनी याबाबत माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणाचा अन्य अंगांनी सुद्धा तपास करत आहोत. अक्षयला पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याची चौकशी सुरु आहे. असेही त्यांनी सांगितले आहे. तिथून जाणाऱ्या एका वाटसरुने या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे.

यामध्ये दिसत आहे की, शैला रस्त्याच्याकडेला जमिनीवर पडली होती. अक्षय तिचे केस पकडून तिला निदर्यतेने मारहाण करत होता. दोघे त्यांच्या कारने गाणगापूर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी चाललं होतं. मूळचे महाराष्ट्राच्या बारामतीचे राहणारे आहेत. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!