तिरुपती बालाजीच्या दर्शनावरुन परतताना भीषण अपघात, बारामतीच्या पती-पत्नीचा मृत्यू, दोन मुलं जखमी, घटनेने हळहळ…


बारामती : बारामती शहरातील शिवाजीनगर परिसरात एका दु:खद घटनेने शोकाकूल वातावरण पसरले. येथे देवदर्शनाहून परत येताना कर्नाटक राज्यातील हुबळीनजिक झालेल्या अपघातात बारामतीतील दाम्पत्यांचा दुर्देवी अंत झाला. तर, या अपघातात त्यांच्या दोन्ही मुलांना मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

हे कुटुंब आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांना भीषण अपघातात झाला. ज्यामध्ये जगताप कुटुंबातील पती-पत्नीचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलंही होती. जे जखमी झाले आहेत.

बारामती येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रिजमध्ये कार्यरत असलेले अनिल सदाशिव जगताप (वय 50) आणि त्यांची पत्नी वैशाली अनिल जगताप (वय 45) अशी मृत दांपत्याची नावं आहेत. तर, त्यांचा मुलगा अथर्व (वय 24) आणि मुलगी अक्षता (वय 20) हे जखमी झाले आहेत.

       

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जगताप कुटुंब शनिवारी (ता.29 नोव्हेंबर) बारामतीहून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बुधवारी (3 डिसेंबर) पहाटे साडेचार वाजता परतत असताना कर्नाटकातील हुबळी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. पुढे जाणाऱ्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावता आणि जगताप यांचे चारचाकी वाहन मागून त्या ट्रकला जाऊन जोरदार धडकलं आणि गाडीचा चक्काचूर झाला.

अपघातात अनिल जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी वैशाली जगताप गंभीर जखमी होत्या. त्यांना तातडीने हुबळी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

अपघातात त्यांची दोन्ही मुलं जखमी झाली असून, सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच गाडीमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा एक लहान मुलगाही होता, सुदैवाने त्यालाही फारशी दुखापत झाली नाही. या दुर्दैवी घटनेनंतर बारामती शहरातील शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!