माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदावर टांगती तलवार ; उपमुख्यमंत्री अजित पवार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत?


पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नुकताच त्यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी शासन भिकारी आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे ते पुन्हा अडचणीत आले. या वक्तव्यानंतर आता त्यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आता माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. स्वत: अजित पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना याबाबत माहिती दिली. तसेच मंत्र्यांनी भान ठेवून बोलावं, अशी तंबी दिली आहे.

मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून चर्चा करू.मला मिळालेल्या माहितीनुसार, ते सभागृहाच्या आतमध्ये घडलं आहे. विधीमंडळाचा परिसर हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अख्तत्यारित येत असतो. त्यांनीदेखील त्या प्रकरणाची चौकशी लावली आहे, अशी माझी माहिती आहे. नक्की तिथे काय झालंय याची चौकशी केली जाणार आहे,अशी माहिती अजित पवार यांनी दिली. आता कोकाटे यांच्याकडील कृषी खात काढून घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!