सतत त्रास देतो म्हणून शाळेतल्या विद्यार्थीनीने बांधली त्यालाच राखी! पण त्याने केले ‘हे’ कृत्य, इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा..
इंदापूर : सतत त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यास शाळेतील रक्षाबंधन कार्यक्रमात विद्यार्थीनीने राखी बांधली. त्यानंतर त्या मुलाने तिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (ता.२) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बावडा परिसरातील एका विद्यालयाच्या आवारात घडली
याप्रकरणी विद्यार्थीनीने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बावड्यातील एकावर पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, विद्यार्थीनी ही विद्यालयात शिक्षण घेत आहे. याच विद्यालयात शिक्षण घेणारा राज हा त्या विद्यार्थीनीच्या पाठीमागे येवून तिची छेड काढायचा. परंतु त्या मुलीने घाबरुन कुणालाही सांगीतले नाही.
शनिवारी (ता. २) रोजी विद्यालयात घेण्यात आलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात तिने राज यास राखी बांधून मी तुझी बहीण आहे, तु यापुढे मला त्रास देवू नये अशी विनंती राजला केली.
त्यावेळी पिडीत मुलीने १२ वीत शिकत असलेल्या इतर एका मुलास राखी बांधत असताना राजने व्हिडिओ बनविला , फिर्यादी मुलीने तो व्हिडिओ डिलीट करण्याचे सांगितले असताना, त्याने व्हिडिओ डिलीट केला नाही. त्यामुळे मुलगी रडू लागली.
पण व्हिडिओ डिलीट केलाच नाही. त्यानंतर पिडीत मुलगी दुकानातून पाणी घेवून ग्राउंडवरुन जात असताना राजने मुलीजवळ येवून तिला मारहाण केली. यावेळी तिने का मारत आहात असे विचारल्यावर पुन्हा त्याने तिच्या केसाला धरुन मारहाण केली.