पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या! घटनेने उडाली खळबळ, धक्कादायक माहिती आली समोर…


पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती आहे.

सागर पवार असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पुण्यात राहून तो MPSC परीक्षेची तयारी करत होता. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह खोलीत आढळून आला.

प्राथमिक माहितीप्रमाणे, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने राहात असलेली खोली आतून लॉक होती, त्यामुळे ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असता, खोली आतून बंद असल्याचे दिसून आले. सकाळी मित्र आणि शेजारी विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मालकाला कळवले. दरवाजा उघडून पाहिल्यावर सागर पवार याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला तात्काळ खाली उतरवण्यात आले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

       

या घटनेनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला असून, अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, परीक्षेच्या ताणामुळे झालेल्या नैराश्यामुळे हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सागर पवारचा मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना तात्काळ संपर्क साधण्यात आला आहे. कुटुंबीय पुण्यात येत असून त्यांच्या जबाबांनंतर या प्रकरणाबद्दल अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सांगितले की, सागर पवार याच्या मोबाईल फोन, वह्या आणि इतर साहित्याची तपासणी सुरू आहे. काही वैयक्तिक समस्या होती की केवळ परीक्षेचा ताण होता, याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, MPSC सारख्या कठोर आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी पुण्यात येतात. अभ्यासाचा ताण, आर्थिक अडचणी, अपयशाची भीती, आणि सामाजिक अपेक्षा यामुळे अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना पुण्यात घडल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!