कणखर बापाचा हळवा लेक! अजित पवारांच्या निधनानंतर जय पवारांची भावनिक पोस्ट, माझा प्रत्येक काळ…..

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबीयासह महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या आठवणीत त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

जय पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “डॅड, माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील,” अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे. यासोबत त्याने अजित दादांसोबत एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात तो अजित पवारांसोबत कोणत्या तरी विषयावर गप्पा मारताना दिसत आहे.
यापूर्वीही वडील अजित पवारांच्या निधनानंतर जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.त्यांनी इन्स्टावर दोन फोटो शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती.. या फोटोवर जयने ‘तुमची खूप आठवण येतेय, डॅड’ असं कॅप्शन लिहिलं होतं. आता वडिलांच्या निधनानंतर पुन्हा एकदा भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या आठवणीत युगेंद्र पवार,रोहित पवार,मुलगा जय पवार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.