मोठी बातमी…! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेच्या विरोधात दिला तगडा उमेदवार 


पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये परळीमधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच विशेष बाब म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना अनुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पक्षातून आमदार नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक रिंगणात असणार आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील चिंचवड विधासभा मतदारसंघातून राहुल कलाटे, तर भोसरीमधून अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघातून मोहन वाजीराव जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजलगावमध्ये अजित पवार यांचे आमदार प्रकाश सोळके यांना मोहन जगताप याचं आव्हान असणार आहे.

पहा संपूर्ण यादी

करंजा – ज्ञायक पटणी
हिंगणघाट – अतुल वांदिले
हिंगणा – रमेश बंग
अणुशक्तीनगर – फहाद अहमद
चिंचवड – राहुल कलाटे
भोसरी – अजित गव्हाणे
माजलगाव – मोहन वाजीराव जगताप
परळी – राजेसाहेब देशमुख
मोहोळ – सिद्धी रमेश कदम

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!