मुंबईत धडकलं मराठ्यांचं वादळ ; उपोषण सुरू होताच बीडच्या ‘या’ दोन आमदारांची तातडीने धाव, जरागेंशी चर्चा..

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषण सुरू होताच बीडच्या आमदारांनी तातडीने उपोषण स्थळी धाव घेतली आहे. त्यांनी जरांगे यांच्या मोर्चाला आणि आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाशदादा साळुंके हे दोन आमदार तातडीने उपोषणस्थळी दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अगदी काही वेळातच दोन्ही आमदार तिथे पोहचले. त्यांनी यावेळी जरांगेशी चर्चा केली. आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केलं. मनोज जरांगे हे सर्व समाजासोबत आहे. सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. तर आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
आझाद मैदानावर मराठ्यांचा वादळ धडकल असून नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण होणार जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस मुद्दामहून चालढकल करत आहेत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर निकाली काढावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
