पुण्यात तुफान हाणामारी; ‘माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलास?’ जाब विचारात मुलींमध्ये राडा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. येथे मुलींच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलास?’ असा जाब विचारत दोन मुलींमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका तरुणीच्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या तरुणीनं मेसेज केला. याचाच राग मनात धरुन संबधित तरुणी मेसेज केलेल्या तरुणीजवळ गेली, आणि ‘माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलास?’ असा जाब विचारला. या वादावादीचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. दोघांमध्ये सुरू असणाऱ्या हाणामारीत आणखी मुली सामील झाल्या आणि जोरदार हाणामारी झाली.
दरम्यान क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात दोन मुलींच्या टोळ्या आपापसात भिडल्या असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
