लोणी काळभोर हद्दीतील रामदऱ्याजवळ आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळला ; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर
लोणी काळभोर : लोणी काळभोर हद्दीतील रामदऱ्या जवळ आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून १ ठार व ३ गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज रविवारी (ता. ४) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
बाळासाहेब काशिनाथ कोळी (वय ४६, राहणार निनाम पाडळी सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तर शुभम विजय लोखंडे (वय २४, धंदा नोकरी राहणार संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे), मयूर प्रमोद लोखंडे (वय-२५ धंदा शेती) व विकास वाल्मीक ढमाळे (वय-२४ राहणार पिंपरी वळण तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर) अशी जखमी झालेल्या तीन जणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडकी गाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस व वादळ सुरू झाल्याने लोकांची धांदल उडाली.
यावेळी पाऊस लागू नये म्हणून त्याच्याखाली वरील चार जन बसले होते. पावसामुळे स्टेजच्या लोखंडी पायऱ्यांचे रील चिखलात खचल्याने एका बाजूला पडले. आणि यामध्ये ४ जन जखमी झाले.