मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव कंटेनरनं तब्बल 20 गाड्यांना उडवलं ; 4 जणांचा जागीच मृत्यू

पुणे : गेल्या काही दिवसापासून मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच आहे.अशातच आज मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटेनर ने 20 वाहनांना धडक दिल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अनियंत्रित कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे थेट २० वाहनांना धडक दिली आहे. या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कंटेनरची धडक इतकी जोरदार बसली की, यात तीन वाहनांचा चक्काचूर झाला. इतर वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले. या भीषण अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून, आतापर्यंत या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा सर्वात वर्दळीचा एक्सप्रेस वे आहे. सुट्टीचा दिवस असल्याकारणाने या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कंटेनरनं नव्यानं बांधलेल्या बोगद्याजवळ सुमारे २० वाहनांना धडक दिली. धडक दिल्यामुळे यात २० गाड्यांचा चक्काचुर झाला. ३ वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. तर, ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.