गोरखपुरला धावणार आता विशेष एक्सप्रेस ट्रेन रेल्वे प्रशासनामुळे उत्तर भारतीयांना मोठा दिलासा …..

Pune Railway : ऑगस्ट महिना सुरू झाला की म्हणजेचं श्रावण महिन्यापासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. दरवर्षी या फेस्टिवल सीझनमध्ये अनेकजण आपल्या मूळ गावाकडे परतत असतात. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या माध्यमातून काही विशेष गाड्याही चालवल्या जातात.

या अतिरिक्त रेल्वेगाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळतो. दरम्यान आगामी काळात येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुणे ते गोरखपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दिवाळीला आणि छठ पूजेच्या काळात रेल्वेमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत असते आणि याच संभाव्य अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आणि छठ पूजेच्या कालावधीत पुणे ते गोरखपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत.

पुणे-गोरखपूर दरम्यान 25 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. या काळात गाडी क्रमांक – ०१४३१ ही रेल्वे दर शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावरून दुपारी सव्वाचार वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी आठ वाजून 40 मिनिटांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच गोरखपूर ते पुणे दरम्यान 26 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या काळात विशेष गाडी चालवली जाईल. या काळात गाडी क्रमांक – ०१४३२ ही रेल्वे दर शनिवारी गोरखपूर येथून रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सोडली जाईल अन तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
ही गाडी या रेल्वे मार्गावरील दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.