मुलबाळ होत नाही म्हणून स्मशानातील राख दिली प्यायला, पुण्यात भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार उघड…!
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलबाळ होत नसल्याने व आर्थिक सुबत्तेसाठी विवाहितेला स्मशानभूमीतील राख पाण्यातून पिण्यासाठी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत सासरच्यांवर सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच त्यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून हाडांची पावडर खाण्यासाठी देऊन कौटुंबिक छळ देखील केला आहे. सासरच्या लोकांच्या भितीपोटी मी ते पाणी पिले. यानंतर जावेच्या आईवडिलांच्या निगडी येथील घरी नेले. तेथे मांत्रिक महिलेने मला पुजेच्या ठिकाणी बसण्यास सांगितले.
तसेच सदर मांत्रिक महिला अर्धा तास अघोरी पुजा करत होती. त्यानंतर हाडाची पावडर करून विवाहितेला एकटीलाच त्या मात्रिक महिलेने खायला सांगितली. तीने नकार दिला असत रिव्हॉल्व्हर काढुन तीच्या डोक्याला लावुन पावडरखाण्यास भाग पाडले.
जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णु पोकळे, दिपक जाधव, स्नेहा जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी सासरच्या लोकांवर जादुटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.