पुण्यात अपघाताचा थरार! ट्रकच चाक डोक्यावरून गेलं अन् वडिलांसमोरच 3 वर्षाच्या चिमुकल्याचा….

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कात्रज परिसरामध्ये अपघाताच सत्र वारंवार सुरू असताना भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ट्रकच चाक मुलाच्या डोक्यावर न गेल्याने त्याचा वडिलांच्या डोळ्यादेखत जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव अंश भाऊरंग कांबळे असे होते. तो कात्रजच्या अंजनीनगरमध्ये राहत होता.चिमुकला वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता. अचानक आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेत चिमुकला दुचाकीवरू खाली पडला. त्यानंतर डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या प्रकरणी ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय ५० वर्षे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो मूळचा लातूरच्या निलंगा येथील आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

यापूर्वी देखील कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज आणखी एका चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील कात्रज आणि परिसरातील वाढते अपघात कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.