पुण्यात गणरायाच्या मिरवणुकीदरम्यान तरुणाकडे सापडलं धारदार शस्त्र ; पोलिसांनी केली मोठी कारवाई


पुणे : राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र पुण्यात,,32 तास उलटूनही अद्यापही गणपती विसर्जन मिरवणूका सुरु आहेत. असंच आता या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडे धारदार कोयता सापडल्याची घटना घडली आहे.या घटनेने शहरातील मिरवणुकी दरम्यान भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.

पुण्यात गणपती विसर्जनाच्या चालू मिरवणुकीत गस्त घालत असताना अज्ञात व्यक्तीला फटाके फोडताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र मिरवणुकीत हा कोयता या व्यक्तीकडे कसा आला. हा कोयता ठेवण्यामागे नेमकं कारण काय हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे नियोजित वेळेत विसर्जन झाले. मात्र इतर काही गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूक सुरु आहेत. या मिरवणुकीत कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असून पोलिसांनी नेमून दिलेल्या नियमांना पुणेकरांनी धाब्यावर बसवले आहे. धक्कदायक म्हणजे चालू मिरवणुकीत पोलिसांना गस्त घालत असताना एका अज्ञात व्यक्तीकडे कोयता सापडल्याने खळबळ उडाली आहे.

       

दरम्यान पुण्या पाठोपाठ मुंबईत देखील २६ तास उलटूनही लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. भरती आणि विसर्जनासाठी गुजरातवरून मागवलेल्या तराफ्यामुळे राजाच विसर्जन रखडलं आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!