पुण्यात घोटाळ्यांची मालिका; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारानंतर शासकीय जमीन विक्रीचा घोटाळा उघडकीस..

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमिनीशी संबंधित प्रकरणात जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण ताजं असतानाच आता पुणे जिल्ह्यातून आणखी एक शासकीय जमीन विक्री घोटाळा समोर आला आहे. ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जागेची परस्पर विक्री कोट्यावधी रुपयात करण्यात आली आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची विक्री परस्पर केली आहे.
पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून य जागेची विक्री करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून याबाबतची माहिती जेव्हा पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी या विषयाची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्ताकडे केली आहे. आता या प्रकरणात पुण्याचे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील कोट्यावधी रुपयाची शासकीय मोक्यची जागा या निमित्ताने लाटण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. आता या प्रकरणाबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची स्परस्पर विक्री केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वांच ठरणार आहे.
