अष्टापूरला येत्या शनिवारी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबीराचे आयोजन; महसुली तक्रारींचे होणार निराकरण…


उरुळीकांचन : लोणीकाळभोर अप्पर तहसिलदार कार्यालयाअंतर्गत नव्याने महसूल मंडळ कार्यालयाची निर्मिती झालेल्या अष्टापूर येथे ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी दि.१४ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत ‘महाराजस्व अभियान’ आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी गिताश्री काळे यांनी देऊन समाधान शिबीरास ग्रामस्थांनी उपस्थित राहून महसूल प्रश्नांची सोडवून करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपर तहसील कार्यालय लोणीकाळभोर यांच्या कार्यक्षेत्रातील अष्टापूर मंडळ कार्यालयातील अष्टापूर, नायगाव, पेठ, खामगावटेक, टिळेकरवाडी , शिंदेवाडी, हिंगणगाव, सांगवी सांडस, न्हावी सांडस या गावचा सामावेश महसूल मंडळात होत असून या गावांतील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्न एकाच छताखाली सोडवून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व कार्यक्षम करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

नागरिकांनी महसूल प्रश्नांसंदर्भात कागदपत्रांनिशी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत आयोजित हे समाधान शिबिर टप्पा क्र. १ असून, नागरिकांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे.

शिबिरात उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा….

तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेल्या व्यवहारांची गावनिहाय यादी तयार करणे

भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे

‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टेवाटपासाठी प्रलंबित लाभार्थ्यांची यादी तयार करणे

‘जिवंत ७/१२’ मोहिमेअंतर्गत प्रलंबित नोंदी निकाली काढणे

अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्कमार्फत ७/१२ वरील चुका स्वीकारणे व दुरुस्ती

सामाजिक अर्थसहाय्य योजनांतर्गत अर्ज स्वीकृती व मंजुरी आदेश वितरण

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अंमलबजावणी

फेरफार नोंदी स्वीकारून अद्ययावत ७/१२ उताऱ्यांचे वाटप

शालेय विद्यार्थ्यांना प्रलंबित दाखले वितरण

पाणंद रस्त्यांबाबत प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना देणे

लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा प्रमाणपत्रे स्वीकारणे व वितरण

अकृषिक तरतुदी संदर्भातील मार्गदर्शन

अॅग्रीस्टॅक, पीएम किसान व ई-केवायसी संदर्भातील कामकाज

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!