लाडक्या बहिणींच्या खात्यात खडखडाट?मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येणार, 3000रुपये जमा होणार


पुणे : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली पण मार्चचा हप्ता अद्यापही झाला नसल्याने लाडक्या बहिणीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिलांच्या खात्यात दोन्ही महिन्याची मिळून 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला होता. फेब्रुवारीचा हप्तादेखील मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर परत एप्रिलच्या हप्त्याबाबतही चर्चा होत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात 3000 रुपये एकत्र येऊ शकतात.

दरम्यान सरकारकडून लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ईकेवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. ईकेवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत महिला केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. ज्या महिलांनी ईकेवायसीमध्ये चूक केली आहे त्या दुरुस्ती करु शकतात. त्यामुळे त्यांना पुन्हा लाभ मिळू शकतो.

लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी केवायसी केलेली नाही. या महिलांना योजनेतून बाद केले आहे. त्यामुळे त्यांना 1500 रुपये मिळणार नाही. आता मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!