वाघोली गावाच्या विकासकामांबाबत लवकरच आढावा बैठक घेणार! आमदार अशोक पवार लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे अश्वासन…!
मुंबई : पुणे महानगरपालिकेतील वाघोली गावातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा या मूलभूत सोयीसुविधा व विकासकामाबाबत लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
शिरुरचे विधानसभा सदस्य अशोक पवार यांनी पुणे महानगरपालिकेतील वाघोली गावातील मूलभूत सोयीसुविधा संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगाव ,वाघोली या गावांकरिता सन 2023 ची लोकसंख्या विचारात घेता ५६ एम. एल. डी. क्षमतेची समान पाणीपुरवठा योजना पुणे महानगरपालिका मार्फत हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून 31 एम. एल. डी. पाणी वाघोलीकरता उपलब्ध होईल.
वाघोलीतील अस्तित्वातील पाच एम. एल. डी. पाणीपुरवठा योजना, पीएमआरडीएमार्फत प्रगतीत असलेली ५ एम. एल. डी. पाणीपुरवठा योजना, पीएमआरडीएमार्फत प्रगतीत असलेली ५ एम एल डी. पाणीपुरवठा योजना व पुणे मनपामार्फत हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतून वाघोलीकरिता उपलब्ध होणारे ३१ एम. एल. डी. पाणी असे सन २०२५ पर्यंत एकूण ४१ एल. डी. पाणी वाघोलीकरिता उपलब्ध होईल. या चर्चेत विधानसभा सदस्य यांनी राहुल कुल, भीमराव तपकीर यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.