प्रवाशांना चिरडणाऱ्या बेधुंद वाहन चालकाला अटक, उरुळी कांचन पोलिसांनी दौंडमधून चालकाला घेतलं ताब्यात…

उरुळी कांचन : सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आता पिकअप वाहन चालकाच्या मुसक्या पोलसांनी आवळल्या आहे.
शशिकांत रोहिदास पवार,(वय. 24 वर्ष,रा. अकलूज, ता. माळशिरस,जि.सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जमीर महबूब मीयाडे, (वय 33 वर्ष, व्यवसाय शेतमजूर रा सहजपूर माकरवस्ती ता दौंड जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
तसेच या अपघातात अशोक भीमराव (वय- 25, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक), व मेहबूब रहमान मियाडे (वय-67, रा. माकर वस्ती सहजपुर ता. दौंड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
तर या अपघातात भारती लक्ष्मण बापूराव रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली), मैनुद्दीन लालमिया तांबोळी (वय 67, रा. आंबा पिंपळगाव, लातूर), वैशाली भागवत बनसोडे (वय 40,रा. सोरतापवाडी ता. हवेली, पुणे), भागवत बनसोडे वय-45, हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी सहा जण तळवडी चौकात वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे होते. याच दरम्यान सोलापूर च्या दिशेने एक पिकअप वाहन निघाले होते. यावेळी चौकात उभे राहिलेल्या चौघांना पिकअप चालकाने जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर तर उर्वरित पाच जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना लाईफ केयर रुग्णवाहिकेतून सिद्धिविनायक हॉस्पिटल हा ठिकानी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. या अपघातात पिकअप चालक हा सोलापूरच्या बाजूने न थांबता पळून गेला होता. आता आरोपीला दौंड येथून अटक करण्यात आली आहे.