गॅंगस्टर शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचला प्लॅन, दोघांना अटक करताच हादरवणारी माहिती आली समोर, पुण्यात खळबळ….


पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते.

मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली आहे.

आरोपींकडून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या दोघांना अटक केली असली तरी या कटात आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची तयारी या अटक करण्यात आलेल्या दोघांनीही केली होती. त्यासाठी त्यांनी पिस्तूल देखील आणले होते. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना दोघांना सापळा रचून अटक केली.

या संपूर्ण कटात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुणे पोलीस आता तपास करत आहेत. या आरोपींच्या निशाण्यावर कोण होते? त्याच्या या कटात आणखी कोण सहभागी आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, शरद मोहोळ याच्यावर ५ जानेवारी २०२४ ला त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळीबार करण्यात आला. शरद मोहोळचाच साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी हा गोळीबार केला. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!