पुण्याच्या स्पा सेंटरमध्ये गेला व्यक्ती, आत जाताच दिसला धक्कादायक प्रकार, पोलीसही धावतच आले…


पुणे : ‘ओपल स्पा अँड सलून’ या नावाखाली चालणाऱ्या या अनैतिक व्यवसायातून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून, स्पा व्यवस्थापिकेला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनआयबीएम कोंढवा परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

या परिसरातील एका आलिशान स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली होती की, एनआयबीएम रस्त्यावरील ‘सनश्री वुड्स कमर्शिअल प्रिमायसेस’ इमारतीत स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू आहे.

तसेच या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी एक बनावट ग्राहक पाठवला. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी छापा टाकला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या कारवाईत पोलिसांनी स्पा व्यवस्थापिका टी. झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय 32, मूळ रा. नागालँड, सध्या रा. कोंढवा) हिला अटक केली आहे.

दरम्यान, या रॅकेटमधील अन्य एका मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तर, चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!