धक्कादायक ! पुण्यात शेजाऱ्याने महिलेचा काढला अंघोळ करतानाचा व्हिडीयो,पुढं काय घडलं ते पहा!!
पुणे : पुण्यात एक संतापजनक घटना येरवडा परिसरात घडली आहे. एका 39 वर्षीय महिलेचा अंघोळ करताना चोरुन मोबाइलवर व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरुमच्या खिडकीतून आरोपीने व्हिडीओ काढला.
याबाबत 39 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विश्वजित शंकर पाटील (वय-24 रा. येरवडा) याच्यावर आयपीसी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.13) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील बाथरुमध्ये आंघोळ करत होत्या. त्यावेळी आरोपी याने बाथरुमच्या खिडकीतून चोरून फिर्यादी यांचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. महिलेने लगेच येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.