पुणे हादरलं! शितपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

पुणे : शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना जून २०२३ ते रविवार (ता. १०) दरम्यान खडकवासला येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा आरोपीने पाठलाग केला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपीने तिला मी तुला लाईक करतो असे म्हणून खडकवासला येथे नेले.

त्यानंतर आरोपीने मुलीला शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंध ठेवले. ही घटना जून २०२३ ते रविवार (ता. १०) खडकवासला येथे घडली असून याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Views:
[jp_post_view]