बारामती पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर कारमध्येच बलात्कार ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल …..


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविद्यालयातील खून प्रकरणानंतर बारामती तालुक्यातील कायदा -सुव्यवस्थेचा आढावा घेण्या सहीत पोलिसांना कठोर राहण्याचे कडक निर्देश दिले आहे.तसेच त्यांनी अल्पवयीन ठरणारी वयोमर्यादा १८
वरून १४ वर्षापर्यंत आणण्याचे सुतोवात केले होते. मात्र एवढ्या सर्व निर्णयानंतर बारामती तालुका पुन्हा हादरला आहे. बारामती शहरात एका मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत कारमध्येच बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरात महाविद्यालयात जात असलेल्या अल्पवयीन मुलीला धमकी देत कारमध्ये बसवून निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर कार मध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, याप्रकरणी शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीने शहर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार शारदानगर माळेगाव येथील रस्त्याच्या बाजूला निर्जन स्थळी हा प्रकार घडला.

बारामतीतील चंद्रमणीनगर येथील युवकाविरोधात शहर पोलिसांनी पोक्सो, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार आरोपी हा पीडित मुलगी महाविद्यालयात येत असताना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येत असे पीडित युवतीला बोलावून कारमध्ये बसवून घेऊन जात होता. महाविद्यालय सुटल्यावर देखील गेटवरूनचे तो तिला कारमध्ये जबरदस्ती बसवून निर्जन स्थळी नेत असायचा. तिला मारून टाकेन असे धमकी देऊन कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करायचा असे या फिर्यादीत नमूद केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!