भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला चक्क मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाची व्यवस्था; संकष्ट चतुर्थी दिवशीच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मटणावर मारला ताव


सोलापूर : सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप पदाधिका-यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी सूचना आणि तक्रारी मांडल्या.

मात्र, या बैठकीला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना चक्क मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांसह रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मटणावर ताव मारल्याची माहिती उघडकीस आली आहे.

हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी संकष्ट चतुर्थी होती. हे माहीत असूनही या दिवशीच भाजप उमेदवाराने मांसाहारी जेवणाच्या पंगती बसविल्याने सांगोला विधानसभा आणि संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माढा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आतापासूनच लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मोहिते-पाटलांनी सांगोला तालुक्यात दोन दिवस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्याने भाजपचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही सांगोला येथे महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!