गावगुंडांकडून विवाहितेला भररस्त्यात नग्न केलं अन्…!! कल्याणमधील घटनेने राज्यात खळबळ


कल्याण : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गावगुंडांनी एका विवाहितेचा विनयभंग करत भर रस्त्यात तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, तिच्या पतीने मदतीसाठी धाव घेतली असता त्यालाही बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण टिटवाळा भागात घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून कठोर कारवाई होण्याऐवजी फक्त एनसी दाखल करण्यात आली, ज्यामुळे पीडित कुटुंबाला न्यायासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली आहे.

पीडित महिलेला त्रास देणाऱ्या गुंडांनी तिच्या पतीकडे ‘या भागात राहायचे असेल, तर तुझी बायको आमच्याकडे पाठव’, अशी संतापजनक मागणी केली. रस्त्यावरच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी फक्त एनसी दाखल करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!